सदगुरू श्री शंकर महाराजांचा ७८ वा समाधी सोहळा २८ एप्रिलपासून
- धार्मिक आणि संस्कृतीक कार्यक्रमाची रेलचेल
पुणे, दि. 20(प्रतिनिधी ) सदगुरू श्री शंकर महाराजांचा ७८ वा समाधी सोहळा दि. २८ एप्रील ते ५ मे दरम्यान साजरा होत आहे. मुख्य समाधी सोहळा व पालखी सोहळा हा वैषाख दुर्गाष्टमी दि. ५ मे सोमवार रोजी सपंन्न होईल.
समाधी सोहळ्याला येणाऱ्या भक्तांसाठी दर्शन २८ एप्रिल सकाळी ६ पासून सुरू होऊन दि. ६ मे रोजी काल्याचे किर्तन ११ वाजे पर्यंत घेता येईल. ऊत्सव सप्तहात समाधी मठ संपूर्ण २४ तास खुला राहणार आहे. भजन किर्तन व संगीत महोत्सव दुपारी १२.३० ते रात्री ९.३० पर्यंत होणार आहे. यात प्रामुख्याने गायन व किर्तन कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ ते रात्री ९.३० पर्यंत होतील. दररोज संध्याकाळच्या आरती नंतर ६.४५ वाजल्या पासून महाप्रसादाचे वाटप मुख्य पटांगणात होईल. संध्याकाळचे ७ ते ९.३० पर्यंत होणारे कार्यक्रम यावर्षी नवीन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील दालनात संपन्न होतील. सदर बदल हा वाढत्या गर्दीचे नियोजनासाठी करण्यात आला आहे. संघ्याकाळच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाप्रसाद वाटपाच्या पटांगणात दोन भव्य एलईडी स्क्रीनवर करण्यात येईल जेणे करून प्रसाद घेणाऱ्या भक्तांनाही कार्यक्रम पाहता येईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र वाईकर, यांनी पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी प्रताप भोसले,सतीश कोकाटे,निलेश मलापाणी उपस्थित होते.
मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमात दि. 28 एप्रिलला पंडित ऊल्हास कशाळकर,दि. 29 ला ऋषिकेश बडवे, 30 तारखेला पद्मश्री अनुराधा पौडवाल, 1 मे ला विठूरंग आकार प्रस्तूत चित्रा देशपांडे,
2 मे ला समाधान महाराज शर्मा, 3 तारखेला हभप गहिनीनाथ औसेकर, 4 मे ला तालयोगी पंडित शिवमणी यांचे सादरीकरण होईल. सप्तहात त्रीकाळ आरती सकाळी ७ , दुपारची आरती १२ आणि सायंकाळची आरती ६.३० वाजता होईल. महाप्रसाद वाटप दररोज सायंकाळी ७ ते १०.३० आणि दि. ५ मे रोजी महा प्रसाद वाटप सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत होईल. दिनांक ५ मे रोजी पालखी सोहळा दुपारी ४ ते ६.३० या वेळात संपन्न होईल. याचदिवशी रक्तदान शिबीर सकाळी ८ ते रात्री ८ वाजे पर्यंत घेण्यात येईल. ६ मे ला काल्याचे किर्तन ११.३० सपंन्न होऊन सर्व दर्शन बंद होऊन परत ७ मे रोजी सकाळी ६ वाजता दर्शन सुरू होईल.
सप्ताहकाळात वाहनांची व्यवस्था अण्णा भाऊ साठे रंगमंदीराच्या वाहन तळात करण्यात आली आहे..
यंदा शंकर महाराजांना पीएन जी गाडगीळ ज्वेलर्सकडून एक तोळ्याचा एक असे दोन सुवर्ण हार तयार करण्यात आले आहेत.दर्शनकाळात भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त, शिवाय पोलिसांच्या दोन मोबाईल वॅन मंदिर परिसरात असतील.दर्शनरांगेवर कापडी मंडप असेल. त्यामुळे उन्हापासून भक्तांचा बचाव होईल, भविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुरेंद्र वाईकर यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा