जहांगीर हॉस्पिटलला इनोव्हेशन्स अँड एक्सलन्स पुरस्कार
पुणे, दि. 14(प्रतिनिधी ) : व्हॉइस ऑफ हेल्थकेअरच्या 'स्ट्रोक इनोव्हेशन्स अँड एक्सलन्स अवॉर्ड्स'च्या दुसऱ्या आवृत्तीत जहांगीर हॉस्पिटलला 'बेस्ट स्ट्रोक केअर हॉस्पिटल इन वेस्ट रिजन' हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नववर्षाच्या प्रारंभातच आपला विजयी घोडदौड कायम राखत, जहांगीर हॉस्पिटलने यंदा ही 'इलेट्स पेशंट सेंट्रिसिटी अवॉर्ड्स' पुरस्कार जिंकण्याचा मान मिळवला आहे. या पुरस्कार सोहळ्यात रुग्णालयाला दोन महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाले. यामध्ये 'जहांगीर वेलनेस सेंटर'साठी 'टॉप प्रिव्हेंटिव्ह हेल्थ ब्रँड' हा पुरस्कार आणि 'बेस्ट हेल्थकेअर सेंटर प्रोमोटिंग पेशंट वेलनेस' हा दुसरा पुरस्कार यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल जहांगीर हॉस्पिटलचे सीईओ विनोद सावंतवाडकर म्हणाले, "हे पुरस्कार आमच्या आरोग्यसेवेच्या उच्चतम मानकांचे प्रतीक असून, रुग्णांच्या अनुभवात सातत्याने सुधारणा करण्याच्या आमच्या कटिबद्धतेसाठी महत्त्वपूर्ण प्रमाणपत्र ठरतात. तसेच, हेल्थकेअर क्षेत्रात नवीन उत्कृष्टतेचे मापदंड स्थापित करतात."
टिप्पणी पोस्ट करा