श्वसन विकारांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधा


पुणे, दि. 10(प्रतिनिधी ) भारतात प्रमुख श्वसन विकार वाढत असून, सीओपीडी, दमा, क्षयरोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग ही गंभीर आरोग्य आव्हाने निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर, जहांगीर हॉस्पिटल आपल्या अत्याधुनिक पल्मोनोलॉजी विभागाद्वारे रुग्णांना प्रभावी उपचार व शुश्रूषा सेवा देण्यात येते.

  जहांगीर हॉस्पिटलमध्ये पल्मोनरी फंक्शन टेस्टिंग (पीएफटी) सुविधा उपलब्ध असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेचे अचूक मूल्यमापन येथे केले जाते. छातीच्या एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे श्वसन आरोग्याची सखोल तपासणी केली जाते. हॉस्पिटलमधील ब्राँकोस्कोपी विभाग श्वसन विकारांच्या निदान आणि उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.याशिवाय, ‘निद्रा - स्लीप स्टडी क्लिनिक’ ही सुविधा देखील उपलब्ध आहे. अलीकडील एआयआयएमएस अभ्यासानुसार, भारतात ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अप्निया (ओएसए) रुग्णांची संख्या वाढत असून, सुमारे १०.४ कोटी लोकांना हा विकार आहे. प्रौढांमध्ये सुमारे ११% लोक ओएसए ग्रस्त आहेत, यामध्ये पुरुषांचे प्रमाण (१३%) महिलांपेक्षा (५%) अधिक आहे. जहांगीर हॉस्पिटलमध्ये गोल्ड-स्टँडर्ड लेव्हल-१ पॉलीसोम्नोग्राफी आणि होम स्लीप अप्निया टेस्टिंग सुविधा उपलब्ध असून, ओएसए, सेंट्रल स्लीप अप्निया आणि अनिद्रा यांसारख्या निद्राविकारांचे निदान आणि व्यवस्थापन येथे केले जाते.त्याचप्रमाणे, अॅलर्जी चाचणी आणि एंडोब्रॉन्कियल अल्ट्रासाऊंड (ईबीयूएस) सेवाही हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने