नवीन मराठी शाळेतील भावी वैज्ञानिक


पुणे :  नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. इ वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू ,विविध वैज्ञानिक खेळणी, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पी.पी. टी. प्रेझेंटेशन सादरीकरण,


विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. शाळेतील अनेक  विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांपैकी उत्कृष्ट प्रयोगांचे प्रदर्शन नवीन मराठी शाळेत  भरविण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दीपक चैतन्य  उपस्थित होते.  नागेश चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख नागेश चव्हाण हे सुद्धा या कार्यक्रमाला सपत्नी उपस्थित होते.  नागेश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मेडल्स ट्रॉफी व प्रशस्तीपत्रके देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन,दीप प्रज्वलन व सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविक केले.  

पवनचक्की,सूर्यचूल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे, ठिबक सिंचन, सोलर पॅनल, पाण्याचे शुद्धीकरण, धुराचा गजर, हायड्रोलिक पार्किंग सिस्टम,जलचक्र,सूर्यमाला,बिजांकुरणतरंगणे-बुडणे, पाण्याची घनता, हवेचा दाब,प्रकाशाचे अपवर्तन,आंतरेंद्रिये ,

फुफ्फुसाचे कार्य अशी विविध मॉडेल्स प्रयोग सादर केले. शिवनेरी वर्गातील शार्दुल दळवी या विद्यार्थ्याने विज्ञान दिनाची माहिती सांगितली.   इ.१ली अननस वर्गातील सार्थक खांबे हा विद्यार्थी डॉ.सी.व्ही. रामण यांच्या वेशभूषेत आला होता. दिनेश निसंग सरांनी आणलेल्या रोबोट ने वेगवेगळ्या शारीरिक हालचाली सादर करत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. . नागेश चव्हाण   प्रयोग सादरीकरण करणाऱ्या मुलांचे कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने