स्वारगेट - कात्रज भुयारी महामेट्रोच्या मार्गीकेच्या अरेखनात बदल -

                                   मेट्रोच्या कामामुळे समाधी आणि मंदिर परिसरास कोणत्याताही धोका नसल्याचे लेखी आश्वासन श्री. सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टची मागणी मान्य.

पुणे, दि. 14:  महामेट्रो ने श्री.शंकर महाराज समाधी ट्रस्ट आणि भक्तांच्या विनंतीला  मान देऊन समाधी खालून जाणारा संकल्पीत भुयारी मार्ग बदलला असून, शासन निर्णया  प्रमाणे मठा जवळील स्टेशनचे नामकरणाचे बाबत कारवाई होईल असे कळवले आहे, अशी माहिती श्री. सद्‌गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र वाईकर, प्रताप भोसले यांनी कळविले आहे.

 स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गांवरील मेट्रो ट्रॅकची आखणी श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी, गाभारा व मठाच्या बाहेरून करणे करण्यात यावी. शिवाय भुयारी मेट्रो मार्ग समाधी खालून जाणार नाही, मेट्रोच्या कामामुळे समाधी आणि मंदिर परिसरास कोणत्याही प्रकारचा धोका वा नुकसान होणार नाही, असे लेखी स्वरूपात आश्वासीत करावे अशी  मागणी निवेदनाद्वारे  श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने महामेट्रोचे  संचालक अतुल गाडगीळ यांच्याकडे केली होती. ती मागणी मान्य करून तसे पत्र महामेट्रोने ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला दिले आहे.
  
यामध्ये  पत्रात  आपण केलेल्या सुचनांप्रमाणे सदरील मार्गिका श्री . सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधीच्या बाहेरून मार्गस्थ करण्यासाठी मार्गिकेचे अरेखन सुधारित करण्यात आले आहे.पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, प्रकल्पाचा भुयारी मार्ग दाट वस्तीमधून असूनही, परिसरातील अस्तित्वात असलेल्या इमारतींना कोणतीही हानी न पोहोचवता कार्य पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, श्री. सद्गुरू  संतवर्य  योगीराज शंकरमहाराज समाधी स्थळास कोणतीही हानी पोहचणार नाही यासाठी महा मेट्रो कटिबद्ध असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे सदरील मेट्रो स्थानकास नाव देणेबावतच्या मागणीबद्दल , पुणे मेट्रो स्थानकांचे नामकरण करणे, नावात बदल करण्याबाबत कार्यपद्धती ठरविणेबाबत शासन निर्णय करण्यात आलेला असून त्यानुसार पुणे मेट्रो स्थानक नामबदलाबाबतची कारवाई करण्यात येईल.मठाने केलेल्या  सूचना आणि सहकार्याबद्दल महामेट्रो  आभारी असल्याचे पत्रात म्हटले आहे.त्यामुळे श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने महामेट्रोचे आभार मानले आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने