काल योग' च्या प्रात्यक्षिकांनी जिकंली मने
पुणे, दि. 19(प्रतिनिधी ) हलासन, उष्ट्रासन असे विविध आसनांचे सादरीकरण, लाठी काठी चालविण्याची कसब, देशाला विविध क्रीडा स्पर्धामध्ये मिळालेले यश हे सर्व अवघे सहा ते दहा वर्षाचे विदयार्थी सादर करत होते.त्यांनी केलेल्या या अनोख्या कालयोगा च्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिकंली.
![]() |
काल योग' च्या प्रात्यक्षिकांनी जिकंली मने |
निमित्त होते केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रेचा समारोप कार्यक्रमाचे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर डेक्कन एजयुकेशन सोसायटीच्या डी ई एस प्रायमरी स्कुलच्या विदयार्थ्यांनी काल योगा चे उत्तम सादरीकरण केले. यावेळी केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, शाळेच्या मुख्यध्यापिका अर्चना धनावडे, पर्यवेक्षिका ग्रेसी डिसुझा, सिमरन गुजर उपस्थित होत्या. क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे यांनी संयोजन केले. सर्व शिक्षिका यासाठी विशेष मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा