मेट्रो ट्रॅकची आखणी श्री सद्गुरू शंकर
महाराज समाधी, गाभारा आणि मठाच्या बाहेरून करावी
![]() |
मेट्रो ट्रॅकची आखणी श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी व मठाच्या बाहेरून करावी – ट्रस्टची महामेट्रोकडे मागणी |
पुणे, दि. 10(प्रतिनिधी ) स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गांवरील मेट्रो ट्रॅकची आखणी श्री सद्गुरू शंकर
महाराज समाधी, गाभारा व मठाच्या बाहेरून करणे करण्यात यावी. शिवाय भुयारी मेट्रो मार्ग समाधी खालून जाणार नाही, मेट्रोच्या कामामुळे समाधी आणि मंदिर परिसरास कोणत्याही प्रकारचा धोका वा नुकसान होणार नाही, असे लेखी स्वरूपात आश्वासीत करावे अशा मागणीचे निवेदन श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांच्याकडे केली आहे.
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधीमठ हे पुण्यनगरीचे शक्तिपीठ असुन येथे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त येत असतात. हा मठ लाखो भाविकांच्या भावनेचा, श्रद्धेचा विषय असून धार्मिक व संवेदनशील आहे. श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महराज समाधी ट्रस्ट हा न्यास “मुंबई सार्वजनिक न्यास कायदा” अन्वये नोंदणीकृत न्यास असून न्यासाचा नोंदणी क्र. ए-७९३ असा आहे. १९४७ साला पासून सद्गुरू श्री शंकर महाराज समाधी मठ, धनकवडी, पुणे, ४११०४३ येथे श्री शंकर महाराजांची समाधी असुन सदर मठाचे व्यवस्थापन आमचे न्यासाचे मार्फत करण्यात येते. श्री सद्गुरू शंकर महाराज २८ एप्रिल १९४७ रोजी समाधिस्त झाले. सद्गुरू श्री शंकर महाराज समाधीचे केंद्र सरकारने टपाल खात्यामार्फत कव्हर जारी केले आहे.
पुढे हेमाडपंथी पध्दतीने सदर समाधी भोवती दगडी गर्भगृह बांधण्यात आले. तद्नंतर समाधीची देखभाल करण्यासाठी सदरील जागेचे मालक श्री जयकिशन पन्नालाल मालपाणी यांनी समाधी मठ असलेली मिळकत २८.११.१९७० रोजी स्थापन झालेल्या न्यासाचे नावे तबदिल करून दिली. सदर न्यास धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असून समाधी व मठाची देखभाल करण्यासाठी विश्वस्तांची कायदेशीररित्या नेमणूक करण्यात येते.
आपल्या कार्यालयातील इंजीनिअर्स व तंत्रज्ञ यांनी दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी समाधी मठातील परिसराच्या खालून जाणाऱ्या भुयारी मेट्रो प्रकल्पाचे संकल्पीत नकाशे विश्वस्त आणि काही भक्तांना दाखवले. या नकाशांवरून सदर मार्ग नेमका समाधी पासून किती अंतरावर आहे याची कल्पना येत नाही.
तरी प्रत्यक्ष जागेवर, जेथून मार्ग समाधी परिसराच्या खालून नेमका कसा जात आहे ती रेषा पांढऱ्या निशाणीने आखून दाखवावी. आपल्या अधिकारात योग्य ते आदेश पारीत करावेत.मठा जवळील मेट्रो स्टेशनला श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी स्टेशन असे नाव देण्यात यावे, असेही श्री संतवर्य सद्गुरू योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टचे सचिव सतीश कोकाटे, विश्वस्त सुरेंद्र वाईकर, प्रताप भोसले यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा